Mon. Jan 24th, 2022

चेन्नईचा हैदराबादवर ७ गडी राखून विजय

देशात सुरु असलेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने सनराईज हैदराबादवर विजय मिळवत आयपीएलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. पहिला सामना हरल्यानंतर चेन्नईचा हा सलग पाचवा विजय आहे, तर हैदराबादचा या स्पर्धेतील पाचवा पराभव आहे.

हैदराबादनं चेन्नईसमोर ठेवलेलं १७२ धावांचं लक्ष्य चेन्नईच्या फलंदाजांनी सहज गाठलं. ऋतुराज गायकवाड आणि फाफ या दोघांनी अर्धशतकं झळकवली. फाफनं ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली,ज्यामध्ये ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. तर ऋतुराजनं ४४ चेंडूत ७५ धावांची खेळी केली, यात १२ चौकारांचा समावेश आहे.

डेविड वॉर्नर आणि मनिष पांडे मोठे फटके मारण्यासाठी झगडत राहिले. त्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डेविड वॉर्नरने ५५ चेंडूत ५७ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर मनिष पांडेने ४६ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *