आयपीएलच्या आगामी मौसमासाठी 971 खेळाडू इच्छूक

मुंबई : आगामी वर्षात आयपीएलचा 13 वा मौसम खेळण्यात येणार आहे. या मौसमासाठी लिलाव प्रक्रीया 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी तब्बल 971 खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे.
या 971 खेळाडूंपैकी 713 खेळाडू हे भारतीय आहेत. तर 258 खेळाडू हे परदेशी आहेत. या परदेशी खेळाडूंपैकी ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक खेळाडूंनी अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण 55 खेळाडू आहेत.
आयपीएलमध्ये एकूण 8 टीम आहेत. या 8 टीममध्ये केवळ 73 खेळाडूंसाठीच जागा आहेत. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- टीम भारतीय आणि परदेशी खेळाडू
- पंजाब 9 4
- कोलकाता 11 4
- राजस्थान 11 4
- बंगळुरु 12 6
- हैदराबाद 7 2
- चेन्नई 5 2
- मुंबई 7 2
- दिल्ली 11 5