Wed. Oct 27th, 2021

पंजाबची लढत दिल्लीसोबत

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब आमनेसामने, कोण जिंकणार सामना?

यंदाचा आयपीएल च हंगाम थोडा उशीर सुरू झाला असला तरी त्यातली रोमांचकता काही कमी झालेली नाही. आज किंग्ज XI पंजाबचा सामना बलाढ्य दिल्ली कॅपिटल सोबत आहे. दिल्ली सध्याला गुणतालिकेत अव्वल आहे तर पंजाब ही शेवटच्या स्थानवरती आहे.

आयपीएल मधले पंजाबचे आवाहन जवळपास संपुष्टात आले असले तरी शेवटच्या सामन्यात मुंबईवर रोमांचकारी विजय मिळवल्यानंतर पंजाबच्या आत्मविश्वासात भर पडली असणार.

दिल्लीने सुद्धा ह्या हंगामात अनपेक्षित कामगिरी करत आपण आयपीएल २०२० हंगामाच्या विजयाचे प्रबळ दावेदार आहोत हे दाखवून दिले आहे.

ह्या आधी देखील हे दोन्ही संघ एकदा आमनेसामने आले होते, अटीतटीचा हा मुकाबला सुपर ओव्हर पर्यंत जाऊन त्यात दिल्ली ने बाजी मारली होती. पुन्हा दिल्ली विरुद्ध पराभव होणार नाही यासाठी पंजाब प्रयत्न करेल. मात्र दिल्ली ने आतपर्यंत भल्या मोठ्या संघांना धूळ चारली आहे

त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या बलाढ्य दिल्ली विरुद्ध च्या सामन्यात विजय मिळवणे पंजाबसाठी आव्हानात्मक असेल. दोन्ही संघ आजच्या सामन्यात कशी कामगिरी करतात हे बघणं उत्साहाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *