Mon. Jan 17th, 2022

आमिर खानच्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान ही नेहमचं चर्चेत असते. सोशल मीडियावर इरा ही सक्रिय असून अनेकदा इरा ही तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच इराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतचं नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांनी काही फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर शेअर केले होते. आता सध्याला इरा ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराने सोशल मीडियावर प्रियकर नुपूर शिखरेबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात इरा ही किकबॉक्सिंग करतांना दिसत आहे.

इराने या व्हिडिओत किकबॉक्सिंग स्टेप्स वापरल्या असून इरा खान फिटनेसाठी नवनवीन प्रयत्न करीत असते. इराने व्हिडिओला शेअर करत लिहलं आहे. ‘किक बॉक्सिंग मला काही जमणार नाही. तसेच पॉप आय ड्रॉप करणंसुद्धा मला जमत नाही. पाहा इथे माझे खांदे काय करत आहेत. हारले मी. फर्स्ट क्लास, सरप्राइझ अॅटॅक’ नुपूर आणि इराचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडलेला दिसत आहे. इरा खान आणि नुपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शिवाय या दोघांची रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. असं कमेंटवरून दिसून येते. व्हिडीओमध्ये ती पिंक आणि ब्लॅक रंगाच्या जिम आउटफिट्समध्ये आहे. व्हिडीओत , इरा नुपूरला पंच आणि किक करण्याचा प्रयत्न करते पण त्यात तिच्याकडून चुका होत आहे आणि ती नुपूरची माफी मागत त्याला मिठी मारतांना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *