Mon. Oct 25th, 2021

बीडच्या इरफान शेख़चे युपीत धर्मांतर कनेक्शन

उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या तीन तरुणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणाचे बीड कनेक्शन उघडकीस आलॆ आहे . यामध्ये एक महाराष्ट्रतील बीडच्या इरफान शेख़ असे या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणचा आहे. तो सध्या दिल्ली या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रीटेटर म्हणून नोकरी करत असल्याचे सांगण्यात आले आहे . मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा संपुर्ण प्रकार त्याच्या नातेवाईकांना समझल्यावर त्यांना खुप मोठा धक्का बसला आहे.

१९८४ साली मोहम्मद उमर गौतमने हिंदू धर्माचा त्याग करुन इस्लाम धर्म स्वीकारला होता . मोहम्मद उमर गौतमचे याचे मूळ नाव श्याम प्रसाद गौतम . काही दिवसांपूर्वी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली . या दोघांवर बळजबरी करून धर्मांतरण करण्याच्या आरोपावरून युपी एटीएसने अटक केली.त्यांनी १ हजार हिंदूंचे धर्मांतर केले असून तसेच मूकबधिर मुलं आणि महिलांचं देखील धर्मांतर केल्याचा पोलिसांचा दावा आहे . त्यांना धर्मांतरण रॅकेटसाठी पाकिस्तानमधील आयएसआयकडून तसेच एका मुस्लिम संघटनेकडून पैसा पुरविला जात असल्याचाही पोलिसांचा दावा आहे .अशाच धर्मांतरण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या लोकांचा सध्या एटीएस कडून शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *