Mon. Oct 25th, 2021

के एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर?

मुंबई: भारतीय टीम ही सध्याला इंग्लंड दौऱ्यावर आहेत. 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध WTC 2021चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. तसेच इंग्लंड दौऱ्यावर क्रिकेटपटूंना त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी बीसीसीआयकडून मिळाली असून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली वामिका आणि अनुष्कासोबत इंग्लंडमध्ये आहे. तर के एल राहुल आपल्या गर्लफ्रेंडसोबत गेल्याची चर्चा ही सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. के एल राहुल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टी या दोघांनी एकाच जागेवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या दोघांनी एकच जॅकेट घातलेला फोटो शेअर केल्यानं दोघं एकत्र इंग्लंडमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. आथियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हॉटेलच्या रूममध्ये ती के एल राहुलचं जॅकेट घालून फोटो शूट करताना दिसत आहे. आथिया शेट्टी या जॅकेटमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. फॅन्सनं ती इंग्लंड दौऱ्यावर असल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. सुनिल शेट्टी यांची मुलगी आथिया आणि के एल राहुलच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. दोघंही गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी त्यांच्या नातेविषयी काहीच खुलासा केला नाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *