जॅक मा बेपत्ता ?
जॅक मा चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक

शशांक पाटील , मुंबई : –अलीबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांनी मागील दोन महिन्यांपासून कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावली नसून ते समाज माध्यामांवर देखील सक्रीय नसल्याने ते बेपत्त्ता झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान जॅक मा हे त्यांच्या स्वत:च्या टॅलेंट शोच्या म्हणजेच आफ्रिकाज् बिझनेस हिरोज या कार्यक्रमाच्या नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहिले नसल्याने देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एका चीनी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जॅक मा हे प्रकाशझोतापासून दूर राहणे पसंत करत असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान जॅक मा यांच्यात आणि चीनी सरकारमधील वाद मागील बऱ्याच काळांपासून सतत चव्हाट्यावर येत होता. याची अलीकडेच म्हणजे २४ ऑक्टोबर, २O२O रोजी प्रचिती आली होती. जॅक मा यांनी शांघायमधील आपल्या एका भाषणामध्ये चीनमधील सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या मते चीनमध्ये संशोधनाला वाव मिळत नाही, तसेच अर्थकारणांवरही त्यांनी भाष्य केलं होतं आणि चीनमधील आर्थिक व्यवस्था बदलण्याची आवश्यकता असल्यांच म्हटलं होतं. दरम्यान जॅक यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची सार्वजनिक कार्यक्रमातील हजेरी कमी झाली असून विशष म्हणजे जॅक मा मागील बऱ्याच काळापासून समाज माध्यामांवर ही सक्रिय नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जॅक मा आणि चीनच्या सरकारमधील वाद त्यांच्या अनुपस्थितीचे कारण तर नाही ना अशा चर्चांना ही उधान येत आहे.
कोण आहेत जॅक मा ?
- जॅक मा चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक
- अलीबाबा या प्रसिद्ध ग्रुपचे संस्थापक मालक
- जॅक मा आपल्या प्रेरणादायी वक्तव्यांसाठी प्रसिद्ध
- आपल्या संस्थेच्या माध्यामातून गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत करतात जॅक मा