Fri. Jan 28th, 2022

‘सरकारच्या हाताला लकवा मारला आहे का?’ – आशिष शेलार

  अमरावती प्रकरणानंतर राज्यात राजकीय आरोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते ऍड. आशिष शेलार यांनी सरकरवर निशाणा साधला आहे. ‘सरकारच्या हाताला लखवा मारला आहे का?’ असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांचा उपस्थित केला आहे.

  ठाकरे सरकार हे गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे, दहशतवादाचे, फुटीरतावाद्यांचे समर्थक असून ठाकरे सरकारकडून हिंदू आमि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. त्या विरोधात भाजप संघर्ष करणार असल्याचा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

  ते म्हणाले, राज्यात दलालांची गँग सुपर पोलीस म्हणून काम करते. सीबीआयला २० वर्षापूर्वीचा दाखला देवून नामोहरम केले जाते. मी नऊ मंत्र्यांचे उदाहरण देतो त्यांच्यावर या शासनाने कारवाई करावी. नगरमध्ये एका मंत्र्यांचा पीए आत्महत्या करतो. त्यावर व्हिडिओ देखील करतो असे करूनही तो मंत्री राज्य मंत्रिमंडळात बसला आहे. तसेच म्हाडाच्या जागेत अनधिकृत बांधकाम केलेले मंत्री देखील या मंत्रिमंडळात असल्याचा आरोप शेलारांनी राज्य सरकारवर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *