Sat. Oct 24th, 2020

पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल अमरनाथ यात्रेकरूंच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा या संघटनेचा हात  असल्याचं स्पष्ट झाले. 

 

पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली.

 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवसस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावली.

 

आयबीचे डायरेक्टर, रॉचे प्रमुख, केंद्रीय गृहसचिव  या बैठकिला उपस्थित आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *