Wed. Jan 19th, 2022

IT कंपनीतील job सोडून आता ‘ती’ राहतेय स्मशानात!

IT सेक्टरमध्ये काम करून चांगला पगार मिळवणं, चांगला जोडीदार निवडून विवाह करणं आणि सुखाचं आयुष्य जगणं हे तरुणांचं स्वप्न असतं. पण अशा चांगल्या पगाराच्या मोठ्या कंपनींमधल्या नोकरीतरी पूर्ण समाधान मिळतं का? त्यातून वरवरचं समाधान मिळत असलं, तरी आत्मिक शांतता मिळत नाही. त्यामुळेच मोक्षप्राप्तीचा विचार अस्वस्थ करायला लागल्यावर प्रत्यांगिरा नावाच्या तरुणीने IT कपंनीतील job सोडून चक्क अघोरी साधनेचा मार्ग निवडला.

सर्व प्रकारच्या साधनांमध्ये अघोरी साधनेकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं.

ही वामाचारी साधना स्मशानात करावी लागते.

प्रेतांमध्ये राहवं लागतं.

अनेक किळसवाण्या आणि बीभत्स गोष्टी केल्या जातात.

ही साधना सर्वसामान्य महिला पुरुष विचारही करू शकत नाहीत, इतकी भयानक असते.

कुंभमेळ्यादरम्यानच अघोरी साधू सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळतात.

मात्र इतरवेळी त्यांचा संचार केवळ भयाण जंगलांमध्ये, स्मशानांमध्येच असतो.

आपली सॉफ्टवेअर कंपनी सोडून अशा प्रकारची साधना करण्याचा विचार प्रत्यांगिराने केला.

आपलं सुखाचं, चैनीचं आयुष्य तिने ठोकरलं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि ती साधनेसाठी स्मशानात जाऊन राहू लागली.

आता ती आयटीमधील मुलींप्रमाणे आयुष्य जगत नाही. ती एका साधकाचं आय़ुष्य जगतेय.

आता ती ब्रांडेड कपडे घालत नाही, तर काळे कपडे घालते. आता तिच्या कपाळावर मोठं कुंकू असतं.

गळ्यात फॅशनेबल नेकलेस नसतात, तर रुद्राक्षांच्या माळा असतात.

प्रत्यांगिनी आता महादेव शंकराची आराधना करते. रात्री अपरात्री पूजा करते. जगातल्या प्रत्येकाला सुख-समाधान मिळावं या हेतूने ती स्मशानात रात्री मध्यरात्री पूजा करते. हेच आयुष्य तिला आता आय.टी.मधील दगदगीच्या आयुष्यापेक्षा जास्त आध्यात्मिक समाधान देणारं वाटतं. याआधीही कुंभमेळ्यदरम्यान 100 इंजिनिअर्स आणि उच्चशिक्षित तरुण दीक्षा घेऊन साधू बनले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *