महराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज वाटते? महेश टिकेकरांची जान कुमार टीका
महेश टिळेकरांची फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जान कुमार केली टीका…

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये अनेक स्पर्धक येतात आणि बिग बॉसच्या घरात राहतात या घरात राहणाऱ्या स्पर्धकांना अनेक टाक्स, दिली जाते.
घरात राहणाऱ्या स्पर्धकांचे भांडणही होतात. बिग बॉसमध्ये केली जाणारी विधानं, स्पर्धकांचं वर्तन हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतो. यावेळी हा शो चक्क मराठी भाषेमुळे चर्चेत आला आहे. आता सध्या बिग बॉसच्या १४ व्या सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा स्पर्धक आहे.
कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याला मराठी भाषा आवडत नाही. किंबहूना मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते असं तो बिग बॉसच्या घरात त्यानं म्हटलं. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेता महेश टिळेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
महेश टिळेकर यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जान कुमार सानूवर जोरदार टीका करत ”मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावं?” अशा शब्दात महेश यांनी जान कुमार झाडलं आहे.
गायक कुमार सानू मुंबईत राहतात, मराठी लोकांनीही त्यांची गाणी आवडतात. कुमार सानू यांना मोठं करण्यात महाराष्ट्राचा वाटा आहे मात्र त्यांचा मुलगा चक्क मराठा भाषेचा अनादर करत आहे. जान सानूने बिग बॉस मधील अभिनेत्री निक्की तंबोळी त्याच्यासोबत हिंदी ऐवजी मराठी भाषेत संभाषण करत होती. त्यावेळी जान कुमारने तिला मराठी बोलण्यापासून रोखलं शिवाय मराठी भाषेवर टीके देखील केली. मला मराठी भाषा आवडत नाही. माझ्याशी मराठी भाषेमध्ये बोलू नकोस. मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते असं म्हणत त्याने निक्की समोर आपला संताप व्यक्त केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर मनसे सुद्दा जान सानूला धमकी दिली आहे.