Fri. Jan 21st, 2022

अद्भूत मंदिर, उन्हाळ्यात देतं आगामी वर्षाऋतूची ‘अशी’ वर्दी!

उत्तर प्रदेशात अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत. वाराणसी, प्रयाग येथे अनेक मंदिरं भाविकांनी भरलेली असतात. मात्र उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील बेहटा येथील एक मंदिर मात्र वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पावसाळ्याची वर्दी देतं.

पावसाळ्यात नव्हे तर भर उन्हाळ्यात मंदिराच्या छतातून गळतं पाणी!   

येणाऱ्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडणार असेल तर या मंदिराच्या कळासातून भर उन्हाळ्यातच पाणी गळू लागतं.

कुठेही पावसाचा मागमूस नसताना भर उन्हाळ्यात कळसातून या मंदिरात पाणी पडू लागलं. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्यावर मात्र भर पावसातही या मंदिरातून पाणी गळत नाही.

पावसाळ्याच्या साधारण आठवडाभर आधी आकाशात काळे ढगही आले नसताना कळसातून पाणी गळत राहातं.

पाणी किती गळतंय, त्यावरून पाऊस किती पडणार याचा अंदाज स्थानिकांना येतो.

छत जास्त गळत असेल, तर पाऊस जास्त येणार आणि कमी गलथ असेल, तर पाऊस कमी येणार असा अंदाज येथील लोक व्यक्त करतात.

पण उन्हाळ्यात कमी जास्त प्रमाणात गळणार छत पावसाळा सुरू झाल्यावर मात्र गळत नाही.

अगदी मुसळधार पावसातही मंदिराचं छत कोरडं असतं. त्यामुळे या चमत्कारामागे नक्की शास्त्रीय कारण काय आहे, याची अजून कल्पना आलेली नाही.

अनेक शास्त्रज्ञ, पुरातत्त्ववेत्ते यांनी या मंदिराचा अभ्यास केलाय.

मात्र गळणाऱ्या छताचं रहस्य अजूनही त्यांना उकललेलं नाही.

कोणाचं आहे हे मंदिर?

हे मंदिर भगवान जगन्नाथाचं आहे.

पुरी प्रमाणेच येथेही जगन्नाथ यात्रा होते.

मंदिरात भगवान जगन्नाथ यांच्याप्रमाणे बलराम आणि सुभद्रा यांच्याही मूर्ती आहेत.

तसंच भगवान सूर्यदेव आणि पद्मनाभ यांचीही मंदिरं प्रांगणात आहेत.

हे मंदिर 10 व्या शतकातील आहे.

या मंदिराचा 11व्या शतकातच जीर्णोद्धार झाल्याचं सांगण्यात येतंय.

मात्र या मंदिराच्या गळक्या छताचा चमत्कार हा दैवी आहे की त्या मंदिराचं बांधकाम करणाऱ्या स्थापत्यकारांच्या अद्भूत कलेचा आविष्कार हे अजून समजलेलं नाही. मात्र अजूनही स्थानिक या मंदिरात टपकणाऱ्या पाण्यावरून पावसाचा अंदाज बांधतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *