‘सत्तांतर होणार नाही’, मतदानानंतर इम्तियाज जलील यांचा दावा
महाराष्ट्रात आज सर्वत्र निवडणूक पक्रीया पार पडत आहे. या निवडणूसाठी अनेक दिग्गज हे मतदान करण्यास मतदान केंद्रावर येत आहेेत.

महाराष्ट्रात आज सर्वत्र निवडणूक पक्रीया पार पडत आहे. या निवडणूसाठी अनेक दिग्गज हे मतदान करण्यास मतदान केंद्रावर येत आहेेत. या पार्श्वभुमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील ?
शिवसेना-भाजप एक हाती सत्ता आणण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांचे पक्षांतर्गत घडवून आणले आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. तसेच राज्यातील विरोधी पक्ष कमकुवत आहे त्यामुळे सत्तांतर होणार नाही.
असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद मध्ये मतदान केल्यानंतर वक्तव्य केले आहे. निवडणुक प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजेच मतदान प्रक्रीया आज महाराष्ट्रात पार पडत आहे. अनेक दिग्गज मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत.