राजौरी सेक्टमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन…

पाकिस्तानने राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार शेल आणि तोफांनी अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केल्यानं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून काश्मिरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या या आगळीकीला तत्परतेने आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानकडून काल (शुक्रवारी) सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. त्यामुळे सीमेवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यापुर्वी २२ डिसेंबरला पाकिस्तानने मानिकोट सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. शिवाय काश्मिरातील नौशेरा सेक्टरमध्येही पाकिस्तानने गोळीबार केला.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल बसस्थानकाला दहशतवाद्यांनी आज हल्ला केला असून तिथे तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर (सीआरपीएफ) दहशतवाद्यांनी ग्रेनेड मारा केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्राल बसस्थानक परिसरात सीआरपीएफ जवान तैनात होते. दहशतवाद्यांनी या जवानांना लक्ष्य करण्यासाठी ग्रेनेड हल्ला केला. यात ८ स्थानिक नागरिक जखमी झाले.