एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला असून झालेल्या चकमकीत चार जवान देखील जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी अयशस्वी ठरवला आहे.
लष्करी सुत्रानुसार, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करणं सोपं जाव यासाठी, एलओसीच्या अखनूर सेक्टरच्या खौर भागात मंगळवारी सायंकाळी जोरदार गोळीबार सुरू केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कारचे चार जवान जखमी झाले आहे.
त्यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सुत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांचे मृतदेह एलओसीवर पाकिस्तानच्या दिशेने पडलेले आहेत व ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याने उचललेले नाहीत. २०२१ मध्ये पाकिस्तानकडून केलं गेलेलं हे पहिलं मोठं शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे.