Wed. Aug 10th, 2022

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद

जम्मू-काश्मीर: जम्मू काश्मीर येथील सोपोरच्या आरामपोरा येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात २ पोलीस शहीद झाले आहेत. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. सुरक्षा दलाचे शोधमोहीम सुरू असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

‘सोपोरमध्ये झालेल्या या हल्ल्यामागील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा हात आहे’, असे काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी म्हटले आहे.

भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्मीरचा भाग बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे. भारताने जम्मू-काश्मीरचे पुन्हा विभाजन केल्याच्या आणि भौगोलिक परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे पाकिस्तान संतापला आहे.

या हल्ल्यातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.