Mon. Mar 1st, 2021

जनता कर्फ्यू आणखी काही काळ राहणार सुरू, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

कोरोनापासून जनतेचा बचाव करता यावा यासाठी राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात येत आहे. यासंदर्भात राज्याचे रोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.  

जमावबंदीचा आदेश

२२ मार्च रोजी घेतलेला जनता कर्फ्यू आता राज्य सरकारने उद्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच ३१ मार्चपर्यंत दुसरा जमावबंदीचा आदेशही काढण्यात येणार आहे.  या आदेशाननुसार ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमण्यावर बंधन आणण्यात आलं आहे. अथयावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना घोळका करता येणार नाही. मात्र रुग्णालय, बँका, दूध, भाजीपाला, किराणा, मीडिया हे मात्र सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *