जावेद अख्तर यांची मशिदी बंद ठेवण्याची मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व धार्मिकस्थळंदेखील बंद करण्यात आली आहेत. तरीही काही ठिकाणी मशिदींमध्ये लोकांची उपस्थिती कमी झालेली नाही. बंदी असूनही लोक मशिदीत जात असल्याचं दिसून आलं आहे. याबद्दल बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गीतकार यांनी भारतातील मशिदीही बंद ठेवण्याचा आग्रह धरला आहे.
जावेद अख्तर यांनी स्कॉलर आणि अल्पसंख्या आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर मेहमूद यांच्या मशिदी बंद ठेवण्याबाबतच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. “कोरोना विषाणूचं संकट असेपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्या, असा फतवा काढण्याची मागणी ताहिर मेहमूद यांनी केली आहे. या मागणीचं मी समर्थन करतो. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात, तर भारतातल्या मशिदी का नाही?” असा सवाल जावेश अख्तर यांनी ट्वीटमधून केला आहे.
योगी आदित्यनाथ यांना पत्र
दारूल उलूमचे मोहतमिम मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात आपण आणि देशातील नागरिक सरकारच्या सोबत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच दारूल उलूमची इमारत कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड म्हणून वापरू शकता, अशी सूचनाही या पत्रातून करण्यात आली आहे.