6 महिन्यात जिओला किती झाला तोटा?
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ग्राहकांना मोफत सुविधा देऊन धमाका उडवून देणा-या रिलायन्स जिओला याचा किती तोटा झाला असेल याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या. अनेक तर्क वितर्क काढले गेले. पण आता जिओ कंपनीने याबाबत माहिती दिली.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी गेल्या 6 महिन्यात जिओला 22.5 कोटी रूपयांचा शुद्ध तोटा झाल्याचं म्हटलं. तर गेल्या वर्षी याच कालावधीतील कंपनीचा शुद्ध तोटा 7.46 कोटी होता असं सांगण्यात आलं.