Tue. Sep 28th, 2021

सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत असल्याने अजित पवार टार्गेट – जितेंद्र आव्हाड

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रत्येक स्तरातून यावरती प्रतिक्रीया नोंदवण्यात आली आहे. अजित पवार हा मुख्यमंत्रीपदासाठी पुढच्या पाच वर्षात ते सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकत होते. परंतु त्या आधीच त्यांच्यावर राज्य बँक घोटाळ्याचे आरोप करण्यात आले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की अजित पवार हे अतिशय भावनाप्रधान आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी पुढच्या पाच वर्षासाठीचं अग्रेसर असणार नावामध्ये अजित पवारांच नाव होत. ते चौदा चौदा तास विधानसभेत काम करत होते. कोणत्याही विषयावरून ते सरकारला थेट प्रश्न विचारत होते.

त्यांनी राज्य बँक घोटाळ्यात त्यांच नाव गुंफल्यानंतर ते अस्वस्थ होते. काल दिलेला राजीनामा त्याला अनेक दिवसापासून त्यांच्या मनात गोंधळ घालत होता. असं ही जितेंद्र आव्हाड म्हणत होते. ते विधानसभेत कोणत्याही विषयाला डायरेक्ट हात घालणारे होते.

माझ्या माझ्यामुळे किती जणांना त्रास होतोय कुटुंबांना त्रास होतोय काकांना त्रास होतोय ही भावना त्यांना खात होती त्यामुळे कुठलेही तर्कवितर्क लावू नये. असे ही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *