Fri. Mar 5th, 2021

म्हणून जितेंद्र आव्हाड यांचं होम क्वारंटाईन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी होम क्वारंटाईनचा निर्णय घेतला आहे. सोलापूरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सोलापूरचे दौरे केले. यादरम्यान एका कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे आव्हाड यांनी होम क्वारंटाईनचा निर्णय घेतलाय.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. उपाययोजना करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातही विविध दौरे करावे लागत आहेत. अशावेळी होणाऱ्या जनसंपर्कादरम्यान या लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशी शक्यता जाणवताच ताबडतोब क्वारंटाईन होण्यातच हित आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानानजिकचा चाहावालादेखील कोरोनाबाधित असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं. या चहावाल्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांचं जाणं होत असल्याने त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *