Sat. Oct 24th, 2020

शरद पवार यांना हिंदूविरोधी ठरवणाऱ्या वारकरी परिषदेवर जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

शरद पवार हिंदू विरोधी असून त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असं फर्मान काढणाऱ्या राष्ट्रीय वारकरी परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी Tweet करून खडे बोल सुनावले आहेत. (Jitendra Awhad slams Warkari Parishad)

संबंधित बातमी-

वारकरी फक्त हिंदूच असतात का?’

शरद पवार यांना विरोध करणाऱ्या राष्ट्रीय वारकरी परिषदेवर टीका करताना हे विरोध करणारे हे ह.भ.प. कोण आहेत हे मला माहित नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं. तसंच वारकऱ्यांचे नेते असतात हेच मला माहीत नाही, असंही ते म्हणाले. वारकरी सांप्रदाय हा कर्मकांडाला खुले आव्हान देणारा होता. त्यात हे कोण आले आहेत? असा सवाल त्यांनी केला. (Sharad Pawar)

जात व्यवस्था तोडण्यासाठी ही वारकरी चळवळ आहे. वारकरी हिंदू असला पाहिजे हे कोणी सांगितलं? मुस्लिमही विठ्ठलाचा वारकरी होता.  सर्व जाती धर्माचे संत का निर्माण झाले याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. तेव्हा पवारांना ‘येऊ नका’ सांगणारे हे लोक कोण? हे काय शंकराचार्य (Shankaracharya)आहेत का? त्यांचं हिंदुत्व हेच हिंदुत्व (Hinduism) आहे का? ते आम्हला सर्टिफिकेट देणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *