Fri. Mar 5th, 2021

‘त्या’ मारहाणीबद्दल जितेंद्र आव्हाड म्हणतात…

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका इंजिनिअरला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. एका व्यंगचित्रावरून आव्हाड यांच्या समर्थकांनी आव्हाड यांच्यासमोर एका इंजिनिअरला मारहाण केली असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना बडतर्फ करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. ट्विटरवरही आव्हाड यांच्याविरोधात नेटिझन्स आक्रमक झाले आहेत. यावर अखेर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ज्यावेळी मारहाण झाली, त्यावेळी मी कामात व्यस्त होतो. मारहाण झालेल्या ठिकाणी मी उपस्थित नव्हतो. २४ तासांपासून मी माझ्या मतदारसंघात तसंच सोलापूर येथील कामाचा आढावा घेण्याच्या कामात व्यग्र आहे. एका इंजिनिअरला मारहाण माझ्यासंदर्भात पोस्ट केल्याबद्दल मारहाण केल्याचं मला सोशल मीडियावरून मजलं, असं स्पष्टीकरण आव्हाड यांनी म्हटलंय.

मारहाण झालेला इंजिनिअर गेल्या ३ वर्षांपासून माझ्या विरोधात वाट्टेल त्या पोस्ट्स करत होता. ही गोष्ट माझ्या कार्यकर्त्यांनी मला अनेकदा सांगितली होती. मात्र मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. या इंजिनिअरच्या फेसबुकवर गेल्यास हा माणूस संघ आणि भाजपच्या विचारांचा असल्याचं लगेच समजतं. यापूर्वीही त्याने अनेक मोठमोट्या नेत्यांची बदनामी केली आहे. या व्यक्तीने वारंवार वादग्रस्त पोस्ट्स केल्या आहेत. त्यामुळे या व्यक्तीची पुढील जबाबदारी भाजपनेच घ्यावी, असं आव्हाड यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *