Sun. Mar 7th, 2021

#हेडलाईन्स @4pm 050518

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 4.00 PM 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद…..’3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही’ माञ सरकारने बँकांना पैसे दिलेत – मुख्यमंत्री
छगन भुजबळांच्या जामिनानंतर सुटकेसाठी वकिलांची धावपळ…शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवणार…मुंबईतल्याच खासगी रुग्णालयात उपचार होणार…

भाजपच्या फायद्यासाठी सरकार भुजबळांना बाहेर काढणार असेल तर ते लोकांना कळतंय…भाजपलाही एक्सपायरी डेट आहे.. राज ठाकरेंची सरकारवर टीका…

मराठा आरक्षणाचा जीआर फाडणाऱ्याविरोधात चंद्रकांत पाटील यांचा गर्भित इशारा… अनेक निर्णय़ मराठा समाजासाठी घेतले असताना आंदोलनं का होताहेत पाटलांचा सवाल…

पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला 26 वर्षे पूर्ण… महिला प्रवाशांसाठी 1992ला आली होती स्वतंत्र लोकल

आता रेल्वे फलाटावरील स्टॉलमधूनही प्लास्टिक होणार हद्दपार… खाद्यपदार्थ प्लास्टिकमधून न देण्याचा स्टॉलधारकांचा निर्णय…

लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांनो सावधान… रेल्वे स्थानकात तत्काळ तिकिटांच्या रांगांचे होणार चित्रीकरण, कारवाईचा बडगा उभारणार

अहमदनगरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश… पलंगाच्या सहाय्यानं बिबट्याला काढलं बाहेर…

मराठमोळ्या दीपा आंबेकरांची न्यूयॉर्क शहरातील  दिवाणी  न्यायाधीशपदी नियुक्ती… भारतीय अमेरिकन न्यायाधीश महिलेनंतर आंबेकर भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश…

अमेरिकेतील हवाई बेटांत भूकंपाच्या धक्क्यामुळे किलौई ज्वालामुखीचा उद्रेक… लाव्हारस पसरल्यामुळे रस्त्यांवरती मोठी भेग…

अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत रणबीर कपूरचीही मराठी चित्रपटात एंट्री… बकेट लिस्टमध्ये पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत दिसणार रणबीर… ट्रेलर लाँचवेळी माधुरीची माहिती

नागपुरात मेट्रो रेल्वेची विशेष प्री लॉन्च राईड आयोजित… अवघ्या तीन वर्षांत नागपूर मेट्रो रुळांवर धावणार… तर मुंबईतही मोनोचंही पावसाळ्यापूर्वी होणार काम पूर्ण… ‘जय महाराष्ट्र’च्या बातमीचा इम्पॅक्ट…

वंशभेदावरून भारतीय इंजिनीअरची हत्या करणाऱ्या अमेरिकन नौदल सैनिकाला जन्मठेप… अॅडम डब्ल्यु पुरिंटननं श्रीनिवास कुचिभोत यांची हत्या

(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *