Mon. Jan 24th, 2022

शपथविधीसाठी कमल हासन यांना निमंत्रण

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून पुन्हा एकदा जनतेने एनडीए सरकारला पसंती दिली. देशभरात 542 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी एनडीएला बहुमत मिळाले. भारतीय जनतेने पुन्हा मोदी आणि भाजपा सरकारला बहुमत दिल्यामुळे एनडीएने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. अभिनेता आणि मक्कल निधी मायम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनाही निमंत्रण दिले असल्याचे समजते आहे.

कमल हासन यांना शपथविधीसाठी निमंत्रण –

देशात एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी राष्ट्रपती यांना भेटून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.
30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहे.
सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे.
शपथविधीला मक्कल निधी माय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
तसेच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम, चिनचे राष्ट्रपती शी जिनपिंग अशा अनेक आंतरराष्ट्रीय लोकांनी निमंत्रण दिले आहे.

कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य –

काही दिवसांपूर्वी अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
स्वातंत्र भारताचे नथुराम गोडसे हे पहिले हिंदू दहशतवादी असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
कमल हासन यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *