Mon. Dec 6th, 2021

कमला हॅरिस आणि पंतप्रधान मोदी यांची ‘फोन पे चर्चा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात गुरूवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीविषयी फोनवर चर्चा झाली. दरम्यान, यानंतर भारतात लसींची कमतरता दूर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतासह अन्य देशांना जूनअखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसपुरवठा करणार असल्याचे अमेरिकेने गुरुवारी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करून लससहकार्याबद्दल आभार मानल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

जूनअखेरपर्यंत किमान आठ कोटी लसमात्रांचे वाटप करण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २.५ कोटी लसमात्रांचा पुरवठा भारतासह काही देशांना करण्यात करण्याचे अमेरिकेचे नियोजन आहे.तसेच कोरोना नंतरच्या काळात जागतिक आरोग्य क्षेत्रातील भागिदारी, अर्थव्यवस्थेची फेरउभारणी अशा मुद्यांवरही यावेळी चर्चा केल्याचे मोदी यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *