अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत
कंगनाने सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो केले शेअर

काही दिवसांपासून बऱ्याचदा चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेचा आली आहे. कंगना राणौत ही सध्या तिच्या कुटुंबाबरोबर महत्त्वाचा वेळ व्यतीत करत आहे.
कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि एक फोटोही शेअर केला. ज्यामध्ये ती तिच्या भावाच्या चेहऱ्यावर हळद लावताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे आणि फोटोद्वारे कंगनानेे नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे.
स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार कंगनाच्या भावाच्या म्हणजेच अक्षतच्या विवाहसोहळ्याचा. पुढील महिन्यामध्ये 12 नोव्हेंबरला उदयपुरमध्ये २० लोकांच्या उपस्थित होणार हा कार्यक्रम २ दिवस असणार आहे तर ११ नोव्हेंबरला संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम असणार आहे.