कंगना राणावत पुन्हा एकदा अडचणीत
कंगना आणि रंगोली ह्यांच्यावर FIR दाखल…

अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही नुकताच शिवसेना सोबतचा वाद मिटला नाही तेच तिच्या अडचणीत आता अजून वाढ होऊ शकते. कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल ह्यांना वांद्रे पोलिसांनी समन्स बजावून मंगळवार पर्यंत चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले आहेत.
कंगना आणि तिची बहीण ह्या ट्विटर वरून आणि मुलाखतीद्वारे लोकांच्या धार्मिक भावना दुखावत असून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत असा आरोप करत मुनव्वर सय्यद नावाच्या इसमाने वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

त्यानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली ह्यांच्यावर FIR दाखल केली आहे. कंगनावर आयपीसीच्या विविध कलमाखाली गून्हा नोंदविण्यात आला आहे. ज्यात १२४A म्हणजेच देशद्रोहचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. कंगणाने ह्या आधी देखील आपल्या ट्विटर अकाऊंट वरून मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीर सोबत केली होते ज्यामुळे शिवसेना आणि कंगना ह्यामध्ये चांगलीच जुंपली होती.