Thu. Mar 4th, 2021

रुपेरी पडद्यावर कंगणा झळकणार इंदिरा गांधींच्या भूमिकेत

कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. सध्याला कंगणा तिचा आगामी चित्रपटासाठी चर्चेत आली आहे. कंगना रणौत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चरित्र चित्रपटात मुख्य भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. कंगणानं टि्वट करत याबाबतची माहिती दिली आहे. कंगनानं ट्विट करत म्हटलेय की, ‘इंदिराजी माझ्यासाठी एक आयकॉनिक महिला आहेत.

त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार आहे. त्यासाठी मी फोटोशूटही केले आहे. मी ज्यावेळी बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती तेव्हा मी विचार पण केला नाही की मी कधी इंदिरा गांधींची भूमिका साकारेल. अशा आशयाचे ट्विट कंगणानं शेयर केलं असून या टि्वटला तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना दिसणार आहे. परंतु हा सिनेमा इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसेल असे सांगण्यात आलं आहे.

या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकर दिसणार असून हा सिनेमा एका पुस्तकावर आधारित असणार आहे असं कंगनाने सांगितलं आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टार या दोन मोठ्या निर्णयही या सिनेमात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटाचे कथानक साई कबीर यांनी लिहिलेलं आहे. शिवाय याचं दिग्दर्शनही साई कबीरचं करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *