Thu. Feb 25th, 2021

कंगनाने दिलजीतला ठरवलं खलिस्तानी

शेतकरी आंदोलन हा मुद्दा हा दिवसेंदिवस फार गंभीर होत आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टि्वट केल्यापासून पुन्हा एकदा वातावरण पेटून आलं आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन करत रिहानाच्या टि्वटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांना रिहानाचे मत पटलेले नाही, या मुद्यावरुन दोन गट पडतील असे चित्र आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतने आणि अभिनेता दिलजीत दोसांझने उडी घेतली आहे. कंगनाने दिलजीतवर टीका करत त्याला टि्वट करून खलिस्तानी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरुन अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा चर्चेत आली असून कंगनाने दिलजीतवर कसून टीका केली आहे. रिहानाच्या टि्वटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांना रिहानाचे मत पटलेले नाही, या मुद्यावरुन दोन गट पडतील असं चित्र आहे. त्यानंतर दिलजीत दोसांझने RiRi हे गाणे रिहानाला समर्पित केले आहे. त्यावरुन कंगनाने दिलजीतला प्रश्न विचारला आहे. कंगना ही सुरुवातीपासूनचं शेतकरी आंदोलना विरोध करत आली आहे. कंगनाने टि्वट करत म्हटलं “याला पण आपले दोन रुपये बनवायचे आहेत, याची प्लानिंग कधीपासून सुरु होती? व्हिडिओ बनवायला आणि नंतर घोषणा करायला, कमीत कमी एक महिना तर लागेल आणि हे सर्व ऑर्गेनिक आहे, यावर आपण विश्वास ठेवावा, अशी त्यांची इच्छा आहे” #Indiatogether #IndiaAgainstPropoganda असं हॅशटॅगही तिने दिले आहेत.

कंगनाच्या या दोन रुपयाच्या टि्वटला दिलजीतने उत्तर दिले आहे. “मला माझे काम शिकवू नको. मी अर्ध्या तासात गाणे बनवू शकतो. तुझ्यावर गाण बनवण्याची माझी इच्छा नाही. पण त्यासाठी मला दोन मिनिटं लागतील. मला त्रास देऊ नको, तू जाऊन तुझं काम कर” असं दिलजीतने म्हटलं आहे.

दिलजीतच्या या टि्वटला देखील कंगनाने पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. मी देशभक्त असून दिलजीतला त्याच्या योजनेत यशस्वी होऊ देणार नाही असं तिने म्हटलं आहे. “माझ एकच काम आहे देशभक्ती. तेचं मी दिवसभर करत असते. मी तेचं करत राहणार. पण खलिस्तानी तुला तुझं काम करु देणार नाही” असं कंगनाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *