अभिनेत्री कंगना रणौतला राष्ट्रीय चित्रपट सर्वोत्तम पुरस्कार

अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला असून‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात कंगाने मुख्य पात्राची भूमिका बजावली होती. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र कंगानाच्या अभिनयाचं या चित्रपटातू फार कौतुक झालं होतं. कंगना हिचा ‘पंगा’ हा चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता या चित्रपटामध्ये कंगनाने जया निगम या महिला कब्बडी खेळाडूची भूमिका साकारली होती. यापूर्वी देखील कंगनाला २००८ साली मधुर भंडारकर दिग्दर्शित फॅशन चित्रपटासाठी सर्वोत्तमच सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०१४ साली क्वीन तर २०१५ साली तन्नू वेड्स मन्नू चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. २००६मध्ये गँगस्टर चित्रपटमधून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कंगनाला भारत सरकारने पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान देऊनही यापूर्वीच गौरवलं आहे. कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी कंगनाला भारत सरकारने हा पुरस्कार प्रदान केला आहे.