Sun. Oct 17th, 2021

‘जागतिक मातृदिन’ निमित्ताने छोट्या मुलाचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या शुभेच्छा

आज ‘जागतिक मातृदिन’ आहे. त्यामुळे अनेक सेलेब्रिटीनी त्यांच्या इन्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आईचे फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहे. मात्र बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिने तिच्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर करत सगळ्यां आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केले आहे. या फोटोत तैमूर आणि त्याचा छोटा भाऊ दिसतं आहे. फोटोत तैमूरने त्याच्या छोट्या भावाल पकडले आहे.

करिनाने हा फोटो शेअर करत लिहिलं “आज संपूर्ण जग आशेवर अवलंबून आहे, आणि हे दोघे येणारा काळ हा चांगला असेल अशी आशा मला देतात… सगळ्या सुंदर आणि सामर्थ्यवान आईंना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…विश्वास ठेवा”, अशा आशयाचे कॅप्शन करीनाने दिलं. या दिवशी मुलं त्यांच्या आईला शुभेच्छा देत असतात. मात्र बेबो थोड हटके केलं आहे. करीनाने यापुर्वी ८ मार्च ‘जागतिक महिला दिनी’ तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिने बाळाला हातात पकडले होते, परंतु त्याचा चेहरा दिसत नव्हता. करीनाने फेब्रुवारीत तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आणि पहिल्यांदा करीनाने तैमूरसोबत छोट्या मुलाचा फोटो पोस्ट केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *