Fri. Apr 16th, 2021

भाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकमध्ये गड राखणे पक्षाला शक्य झाले नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक जनमत चाचण्यांनी कर्नाटकमध्ये कुणालाच बहुमत मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली होती. विशेष म्हणजे निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्नाटकात दाखल झाले होते.

मार्चमध्ये त्रिपुरा आणि नागालँडमध्येही सत्ता स्थापन करत भाजपाने २१ राज्यामध्ये आपली सत्ता स्थापन केली. काँग्रेसकडे आता केवळ मिझोरम आणि नुकताच विजय मिळवलेले पंजाब अशी दोनच राज्ये राहिलेली आहेत. मात्र काँग्रेस आणि त्रिशंकूला मागे टाकत भाजपची कर्नाटकमध्येही एकहाती सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरु

कर्नाटकमधील २२४ जागांपैकी बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता होती. मात्र, आता सुमारे 105 जागांवर भाजपा जिंकली असून इथेही भाजपा सत्ता स्थापन करेल असं दिसत आहे. कर्नाटकमधला काँग्रेसचा पराभव राहुल गांधींसाठी आणि पक्षासाठी २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मोठा धक्का ठरला असं राजकीय जाणकार सांगतात.

आता देशाच्या लोकसंख्येच्या 5 टक्के लोकसंख्या असलेल्या कर्नाटकातही भाजपाची सत्ता आल्यामुळे तब्बल 75 टक्के जनता भाजपाप्रसाशित राज्यांमध्ये राहते असं म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *