Jaimaharashtra news

कर्नाटकचा तिढा कायम; मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

कर्नाटकातील जेडीसच्या 19 आमदारांनी राजीनामा दिला आणि कर्नाटकचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी दोन अपक्ष आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर लवकर मतदान घेण्यात यावे अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. परंतु या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने तात्काळ नकार दिला असून मंगळवारी या यचिकेवर सुनावणी होणार आहे.

कर्नाटकचा तिढा कायम

सोमवारी म्हणजेच आज कर्नाटकमध्ये सुरू असणारा राजकीय तिढा सुटेल याची शक्याता आता कमी झाली आहे.

या प्रकरणी दोन अपक्ष आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचा निर्णय आज होणार होता.

एच.डी. कुमारस्वामी सोमवारी पाच वाजण्याच्या आधी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली होती.

या दोन अपक्ष म्हणणं ऐकून घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला आहे. असा आदेश देवू शकत नसल्याचे कोर्टाने सांगीतले आहे.

याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. आता मंगळवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

तर कुमारस्वामी यांनी बुधवार पर्यंत बहुमत चाचणी सिद्ध करण्यास वेळ द्यावी अशी मागणी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे केली.

परंतु या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने तात्काळ नकार दिला असून मंगळवारी या यचिकेवर सुनावणी होणार आहे.

Exit mobile version