KBC मध्ये करोडपती बनलेल्या बबिता ताडे यांचा संघर्षमय प्रवास!

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील शाळेत खिचडी शिजवणाऱ्या बबिता सुभाष ताडे या ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये कोट्यधीश झाल्या आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत त्या 1 कोटींपर्यंत पोहोचल्या.
बबिता ताडे यांचा संघर्षमय प्रवास!
बबिता ताडे या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीतील पंचफुला हरणे विद्यालयात शालेय पोषण आहार शिजवून खाऊ घालण्याचं काम करतात.
त्यांचे पती सुभाष ताडे हे याच विद्यालयात शिपाई आहेत.
बबिता या पदवीधर आहेत.
विवाहानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
त्यांना प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे परीक्षा देता आल्या नाहीत, पण पुस्तकवाचनाची आवड त्यांनी कायम ठेवली.
ताडे यांना एक मुलगी, एक मुलगा आहे.
मुलगी पुण्याला शिक्षण घेत असून मुलगा अंजनगावातच शिकत आहे.
शाळेत खिचडी शिजवणाऱ्या बबिता ताडे अमरावती जिल्ह्यातील पहिल्या ‘करोडपती’पुस्तक वाचनाची आवड त्यांना KBC मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणादायक ठरली.
स्पर्धेच्या अकराव्या सिझनमध्ये 32 लाख इच्छुकांपैकी 4,800 स्पर्धक पात्र ठरले होते. त्यातील 120 स्पर्धक ऑडिशनसाठी निवडले गेले. त्यातून बबिता यांना ‘हॉट सिट’ वर बसून प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी सहजपणे प्रश्नांची उत्तरे दिली आणि 1 कोटींचे बक्षीस जिंकले.