Mon. Jun 14th, 2021

‘या’अभिनेत्रीचे टि्वटर अकाऊंट हॅक

कबीर सिंह या चित्रपटातून मिळालेल्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सतत चर्चेत असते. तिचे टि्वटर अकाऊंट हॅक झाले आहे.

अनेक सेलिब्रिटीचं टि्वटर अकाऊंट हॅक झाले आहेत. अमिताभ बच्चन, शाहिद कपूर, महेश भट्ट, क्रिती सेनॉन याचंही टि्वटर अकाऊंट हॅक झाले होते.  कबीर सिंह या चित्रपटातून मिळालेल्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सतत चर्चेत असते. कियारा अडवाणी ही सोशल मीडियावर अॅक्टीव असते.  तिचे टि्वटर अकाऊंट हॅक झाले आहे. ह्या बद्दलची माहिती तिने आपल्या चाहत्यांना इन्स्ट्राग्रामवरुन दिली आहे.

कियारेचे अकाऊंट हॅक

अभिनेत्री कियारा अडवाणीचे टि्वटर अकाऊंट हॅक झाले असून, अजून तरी तिच्या अकाऊंट वरुन कोणतीही पोस्ट शेअर केली नाही.मात्र कियाराच्या फॉलोअर्सला काही लिंक्स पाठविण्यात येत आहे.

तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत ही माहिती दिली आहे की, माझं टि्वटर अकाऊंट हॅक झालं आहे. ही समस्या लवकरच दूर व्हावी म्हणून आम्ही याकरिता  प्रयत्न करत आहोत.

सगळ्यांनाच अशी विनंती आहे की, जर माझ्या अकाऊंटवरुन काही चुकीचे ,संदेश आले तर त्याच्याकडे कृपया दुर्लक्ष करा आणि कोणतीही लिंक आली तर त्यावर क्लिक करु नका. माझे टि्वटर अकाऊंट हॅक झाले आहे, त्यामुळे तुम्हाला मेसेज मी करत नाहीये असे कियाराने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *