Sun. May 9th, 2021

बहिणीशी बोलल्याच्या रागातून अपहरणाचा डाव

बहिणीशी बोलत असल्याचा राग मनात ठेवून सोबत काम करणाऱ्या कामगाराचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी अपहरण करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

भिवंडच्या पूर्णा येथे राहणारा मोहम्मद शकील खान हा सायंकाळी घरी न परतल्याने पत्नी आस्मा हिने नारपोली पोलिसांकडे पती हरवल्याची तक्रार केली. पण त्या नंतर दुसऱ्या दिवशी पत्नीच्या मोबाईलवर आपणास डांबून ठेवले असल्याचं आणि सुटकेसाठी 15 लाखांची मागणी केली जात असल्याचं शकीलने सांगितलं.

पत्नीने नारपोली पोलिसांकडे या बाबत तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अंबरनाथ येथील वस्सीउल्लाह सिताबुल्ला खान आणि त्यांचा साथीदारांना ताब्यात घेतले आणि अपहरण झालेल्या व्यक्तीची सोडवणूक केली आहे .

काय घडलेलं नेमकं?

आरोपी शगिर अब्दुल रहमान चौधरी हा शकीलच्या हाताखाली काम करीत होता.

शकील आपल्या बहिणीसोबत बोलत असल्याच्या संशयावरून अब्दुलचा त्याच्याशी वाद झाला.

याचाच राग मनात ठेऊन आरोपी शगिर अब्दुल रहमान चौधरीने शकीलचं अपहरण केलं.

शकीलला जंगलात फसवून नेऊन त्याला एका गोदामात बांधून ठेवण्यात आलं.

त्याच्या सोडवणुकीसाठी 15 लाख रुपयांची खंडणीही मागितली.

त्यांच्या तावडीतून तीन दिवस बंदी बनून ठेवलेल्या मोहम्मद शकील खान या इसमाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *