रामाची तुलना बाबरासोबत करणं मान्य नाही- किरीट सोमय्या

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
काय म्हटलंय ट्विटमध्ये ?
शरद पवारांनी राम जन्मभूमी मंदिर ची बाबरी मशिद शी तुलना करणे, ह्याचा खेद वाटतो. सर्वोच्च न्यायलयाने निर्देश दिले आहेत.
राम जन्मभूमीवर श्रीरामांचा भव्य मंदिर बनावं, अशी हिंदुस्थानच्या सव्वाशे कोटी लोकांची भावना आहे.
या भावनेचा मोदी सरकार आदर करते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनाला मुस्लिमांसाठी काही करायचं असेल, तर करावं.
मुंबईतील हाजीआली दर्ग्यालाठी ३५ कोटी दिले. हज यात्रेसाठी सवलत दिली जाते. पण रामाची तुलना बाबरासोबत करणं, हे मान्य नाही, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
असं किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले होते ?
अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टद्वारे आर्थिक मदत देण्यात येत आहे. परंतु बाबरी मशीद पाडली, त्यासाठी सरकार काही मदत करत नाही.
राम मंदिर प्रमाणे बाबरी मशिदीसाठीही ट्रस्ट तयार करावी. आणि मशिदीसाठी मदत करायली हवी, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार येथे लखनऊमधील एका कार्यक्रमात बोलत होते.