Wed. May 18th, 2022

संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.  संपूर्ण कर्जमाफी आणि मागण्या मान्य करण्यासाठी गेल्या वर्षी मुंबईत शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला होता. या मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नसल्याने किसान सभेने २० फेब्रुवारीला पायी लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्च नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी लाँग मार्चमध्ये काय झाले ?

गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी लाँग मार्च काढला होता.

यावेळी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या होत्या.

मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यामुळे किसान सभेने यावेळी पुन्हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी मागण्या काय ?

यावेळी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या असल्याची माहिती किसान सभेने दिली आहे.

राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केल्यामुळे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देऊ नये.

या लाँग मार्चमध्ये नाशिक, ठाणे, पालघर, पुणेसह मराठवाडा व विदर्भातून शेतकरी सहभागी होणार आहे.

हा मार्च २७ फेब्रुवारी पर्यंत मुंबईत धडकणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.