Fri. Nov 15th, 2019

समलैंगिक संबंधांना नकार दिल्याने तरुणावर हल्ला

समलैंगिक संबंधाना नकार दिल्याने पुण्यातील टिळक रोडवर एका तरुणावर तिघांनी चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिनेश उर्फ सुरेश कांबळे वय 24 जखमी तरुणाचे नाव आहे.मयूर मोतीराम राठोड वय 18,महेश धनेश तिवारी वय 18 आणि एक अल्पवयीन असे तिघे हल्लेखोर असून हे सर्व येरवडा भागात राहणारे, यांना अटक करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं? 

खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक रोडवरील काका हलवाई मिठाई दुकानाच्या समोर असणाऱ्या जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर दिनेश ऊर्फ सुरेश कांबळे या तरुणास मयूर मोतीराम राठोड,महेश धनेश तिवारी आणि एक अल्पवयीन या तिघांपैकी एकाने त्याला घेऊन गेले.

तेव्हा दिनेशकडे सेक्सची मागणी केली असता. त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यात तिघांनी दिनेशवर चाकूने सपासप वार केले.

या अचानक झालेल्या हल्ल्याने दिनेशने जोर जोरात आरडा-ओरडा केल्याने नागरिक जमा झाले.

त्यानंतर सर्तक नागरिकांनी त्या तिघांना पकडून ठेवले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्या तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *