Mon. Jun 14th, 2021

कोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले

केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांची पत्नी अॅन्ना इडननं फेसबुक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यान खळबळ उडाली आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांची पत्नी अॅन्ना इडनने फेसबुकच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट शेअर केले आहे. खळबळ उडाली आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

नेमकं काय घडलं ?

अॅन्ना इडनने मंगळवारी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे.

नशीब बलात्कारासारखे आहे, जर ते थांबवता आले नाही तर त्याचा आनंद घ्या,’ असं त्या पोस्टमध्ये लिहीले आहे.

अॅन्ना यांच्या या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अॅन्ना यांनी पोस्टमध्ये कॉंग्रेसचे खासदार हिबी इडन म्हणजेच पतीचा फोटो शेअर केला आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर खासदार हिबी यांच्यावर टीकेची लाट उसळली आहे. या वादानंतर अॅन्ना यांनी माफी मागितली आहे.

कोच्चीमध्ये सध्या पाउस पडत असून नेटकऱ्यांनी अॅन्नाच्या पोस्टचा संबंध जोडला आहे.

कोच्चीमधील परिस्थितीची पोस्टद्वारे खिल्ली उडवली असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केली आहे.

वाद निर्माण झाल्यानंतर अॅन्नानं ही पोस्ट फेसबुकवरून हटवली आणि माफीही मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *