Tue. Dec 7th, 2021

कोल्हापूर, सातारा ,सांगलीतील पुरग्रस्तांसाठी बीडकरांकडून मदत

कोल्हापूरच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी सांगली शहरात पुरामुळे खुप गंभीर अवस्था आहे. कृष्णा नदीच्या पाण्यात मात्र वाढ झाली आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा असून मोठया प्रमाणात लोक अडकले आहेत.

कोल्हापूरच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी सांगली शहरात पुरामुळे खुप गंभीर अवस्था आहे. कृष्णा नदीच्या पाण्यात मात्र वाढ झाली आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा असून मोठया प्रमाणात लोक अडकले आहेत. चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा असल्याने प्रशासनाची मदत वेळेत पोहोचत नाही. कोल्हापूर , सातारा ,सांगलीकरांच्या मदतीसाठी बीडकर पुढे आले आहेत. खाण्याच्या वस्तूसह कपड्यांचा ट्रक बीडमधून रवाना करण्यात आला आहे.

पुरग्रस्तांसाठी बीडमधून मदत

एकात्मतेचे दर्शन दाखवत बीडकरांनी माणुसकी जागवली. सांगली , कोल्हापूर येथे पूर परिस्थितीमुळे लाखो नागरिकांचे घरदार उद्धस्त झाले आहेत. पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात म्हणून बीडकरांनी कपडे व खाण्याचे साहित्य गोळा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी पाठवली आहे .

याशिवाय बीड जिल्ह्यातील शहरातील काही शाळा महाविद्यालयांनी फेरी काढून पैसे गोळा केले आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे.

पुर परिस्थितीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक नागरिक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी बीडकर सरसावले आहेत .

शुक्रवारी शहरातील विविध भागातून कपडे व खाण्याच्या वस्तू तसेच पाण्याच्या बाटल्या एकत्र करून कोल्हापूर आणि सांगलीसाठी पाठवण्यात येत आहेत.

याशिवाय बीड शहरातील काही शाळा महाविद्यालयांनी एकत्र येत शहरातून फेरी काढून पैसे गोळा केले आहेत.

पैसे व खाण्याच्या वस्तू तसेच कपडे शनिवारी सकाळपर्यंत कोल्हापूर व सांगलीला रवाना करणार असल्याची माहिती मदत कर्त्यांनी दिली यांनी दिली. कोल्हापूर व सांगलीकरांसाठी दाखवलेल्या बीड करांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *