कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून पुन्हा सुरू

20 दिवसापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा शनिवारपासून (28 डिसेंबर) पुन्हा सुरू झालीय. 7 डिसेंबरपासून ही सेवा बंद होती.
ट्रूजेट कंपनीकडून सुरू असलेली ही सेवा अचानकपणे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती.
यासाठी मुंबईत वेळेत स्लॉट मिळत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते.
उडाण योजनेतून सुरू असलेली आणि प्रवाशांना परवडणारी ही सेवा बंद झाल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
मात्र जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुराव्याने पुन्हा ही सेवा पूर्ववत करण्यात आलीय.