Tue. Jun 2nd, 2020

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ७ डिसेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत बंद

मुंबई : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर यादरम्यान बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या कामाचा परिणाम कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेवर झालाय.

२८ डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती रविवारी ट्रू जेट विमान कंपनीच्या वतीने देण्यात आली. या दरम्यान तिकीट बुक केलेल्यांना तिकिटाचा परतावा देण्यात येणार असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलय.

टू-जेट कंपनीचे ७२ प्रवासी क्षमतेचे विमान त्याच्या वेळेमुळे तसेच इतर ठिकाणांहून हे विमान येत असल्याने नियोजित वेळेपेक्षा ते उशीरा येण्याच्या घटना अनेकदा घडतात.

त्यातच मुंबईत विमानतळावर रनवेचे काम सुरू असल्यानेही विमान उतरवण्यास उशीर होतो. परिणामी विमानसेवा थांबवण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *