राजापूरच्या गंगेचे जेमतेम सहा महिन्यात पुनरागमन
जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
निसर्गातील चक्राच्या चक्रावून टाकणाऱ्या घटनांत आणखी एक भर पडली आहे.
सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी प्रकटणाऱ्या राजापूरच्या गंगेचे जेमतेम सहा महिन्यांतच पुनरागमन झाल्यामुळे भाविकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज पहाटे कोकणातली प्रसिद्ध राजापूरची गंगा अवतरली असून राजापूरात गंगेचे आगमन झाले.
राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली. यापूर्वी दर तीन वर्षांनी या गंगेचे आगमन व्हायचे.
मात्र, 2012 साला पासून दरवर्षी गंगेचे आगमन होत. या वेळी ती किती काळ वास्तव्य करते, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे.