देशाच्या आर्थिक सल्लागारपदी कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती

देशाचे नवे आर्थिक सल्लागार म्हणून इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे कृष्णमृती सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. सरकारने एक पत्रक काढून ही घोषणा केली आहे.
अरविंद सुब्रह्मण्यम यांनी जुलै महिन्यात वैयक्तिक कारणांनी राजीनामा दिला होता.अरविंद सुब्रह्मण्यम यांचा पदभार कृष्णमृती यांना सोपविण्यात आला आहे.
कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची कारकीर्द –
- सध्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस येथे फायनान्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
- तसेच जगातील उच्च स्तरीय बँकींग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिर पॉलिसी तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना केली जाते.
- कृष्णमृती यांनी करिअरच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमधील जेपी मॉर्गन या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम केले.
- त्यानंतर आयसीआयसीआयच्या एलाइट डिरेव्हेटिव्हज गटात व्यवस्थापक म्हणून पदभार सांभाळला होता.