Fri. Nov 27th, 2020

कुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ वेबसिरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत

प्रख्यात बॉलीवूड दिग्दर्शक कुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ ही आगामी वेब मालिका ‘झी5’वर दाखल होत आहे. अभिनेता राजीव खंडेलवाल त्यात प्रमुख भूमिकेत आहे.

भारतातील एक आघाडीचा स्टुडीओ म्हणून ख्याती असलेल्या ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मीडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)ने चित्रपट, टेलीव्हीजन आणि वेबसिरीज या क्षेत्रांमध्ये निर्मिती केली आहे. मराठीमध्ये या कंपनीने ‘मोगरा फुलला’,  ‘फुगे’, ‘तुला कळणार नाही’, ‘रणांगण’ या चित्रपटांची निर्मिती केली असून ‘भिकारी’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

‘नक्सल’ ही वेबसिरिज भारतातील नक्षलवादी चळवळीवर बेतली आहे. या मालिकेसाठी तब्बल दीड वर्षं संशोधन केलं गेलं आहे आणि त्यासाठी या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे सहाय्य घेतलं गेलं आहे. या मालिकेमध्ये वेब जगतातील अनेक आघाडीचे चेहरे नक्षलवाद्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

कुणाल कोहली हे बॉलीवूडमधील एक आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘फना’, ‘हम तुम’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसारखे अत्यंत गाजलेले चित्रपट दिले आहेत. ‘नक्सल’ ही त्यांची पहिलीच वेबसिरीज असून ती त्यांच्या चित्रपटाएवढीच लोकप्रिय ठरेल, असा पूर्ण विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *