Thu. Jun 4th, 2020

धक्कादायक: महिला शिक्षिकेकडून लैंगिक छळ, विद्यार्थिनीच्या गुप्तांगात घातली पेन्सिल

ट्युशन चालू असताना टिचरने दोन्ही मुलींचे कपडे काढून त्याच्या प्रॉयव्हेट पार्ट मध्ये पेन्सिल घालून जखमा केल्या. या भीषण घटनेचा शिक्षिकेने व्हिडिओदेखील शूट केला आणि आपल्या बॉयफ्रेंडला पाठवला. या विकृत शिक्षिकेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी चांगलाच चोप दिला. अखेर दोघांनाही पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

लैंगिक छळ झालेल्या दोन्ही मुली या सख्ख्या बहिणी असून त्यांची वयं जेमतेम 3 वर्षं आणि 6 वर्षं अशी आहेत.

ट्यूशनवरून घरी आल्यानंतर गुप्तांगात (private part) मध्ये दुखत असल्याची तक्रार आईकडे मुलीने केली.

तेव्हा गुप्तांवर झालेल्या जखमा पाहून आईला धक्काच बसला.

आरोपी टिचरने मुलींचे कपडे काढून त्यांच्या गुप्तांगात पेन्सिल घातल्याचं लहान मुलीने सांगितलं.य़
या गोष्टीचा शिक्षिकेने व्हिडिओ शूट केल्याचंही तिने सांगितलं.

यावेळी गुप्तांगात वेदना होत असल्याची तक्रार मुलीने केल्यावर शिक्षिकेने त्यांना कपडे घालून पुन्हा शिकवायला सुरुवात केली.

मोठ्या मुलीनेही आपल्यासोबत हा प्रकार घडल्याची माहिती दिली.

या घटनेबद्दल मुलींच्या पालकांनी महू पोलिसांत तक्रार दाखल केली.

अनैसर्गिक कृत्य आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत शिक्षिका आणि तिच्या बॉय फ्रेंडला अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी अटक करण्यापूर्वी या विकृत शिक्षिकेची आणि तिच्या बॉयफ्रेंडची मुलींच्या पालकांनी धुलाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *