Fri. Oct 23rd, 2020

प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा- लक्ष्मण माने

लोकसभा निवडणुकीनंतर काही काळातच वंचित बहुजन आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्याचं चित्र दिसू लागलंय. वंबआचे पदाधिकारी लक्ष्मण माने यांनी आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांचा राजीनामा मागितला आहे. आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच माने यांनी केली आहे.

पडळकर आयत्या बिळावर नागोबा?

पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच भाजपशी संबंध असणारे गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये महासचिवपद देण्यात आलंय.

त्यामुळेच प्रकाश आंबेडकर RSS आणि BJP च्या लोकांना पक्षात आणत असल्याची टीका माने यांनी केली आहे.

वंबआ आता बहुजनांची राहिली नसून ती आता उच्चवर्णियांची झाल्याचं माने म्हणाले.

आघाडीच्या उभारणीत आपण मेहनत घेऊनही ‘हे’ आयत्या बिळावरचे नागोबा बनले असल्याचा आरोपही लक्ष्मण माने यांनी केलाय.

आंबेडकर यांच्या या धोरणाचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा झाल्याचंही माने यांनी म्हटलं.

लक्ष्मण माने यांच्या या बंडखोरीमुळे वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळण्यात अडथळे येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *