Tue. Nov 24th, 2020

लालूप्रसाद गोत्यात, ‘त्या’ प्रकरणी सीबीआयकडून छापेमारीसह गुन्हा दाखल

वृत्तसंस्था, पाटणा

 

माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला. एवढंच नाही तर लालूप्रसाद यांच्या घरावर तसंच कार्यालयासह 12 ठिकाणांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.

 

लालूप्रसाद रेल्वेमंत्री असतानाचं हे प्रकरण आहे. 2006 मध्ये रांची आणि पुरी इथल्या हॉटेल्सच्या देखभालीसाठी निविदा काढताना अनियमितता केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

IRCTC च्या हॉटेल्सची कंत्राट देतानाचं हे प्रकरण आहे. लालूंसह त्यांची पत्नी राबडी देवी, त्यांचा मुलगा तसंच IRCTC च्या माजी व्यवस्थापकीय संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लालूंच्या निवासस्थानासह दिल्ली, पाटणा, रांची, पुरी आणि गुरगाव इथं छापेमारीची कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *